इंदापूर

इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांचेकडून भाजप विजयाचा आनंदोत्सव

भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांचेकडून भाजप विजयाचा आनंदोत्सव

भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

इंदापूर : प्रतिनिधी

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपने चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल इंदापूर येथे गुरुवारी (दि.१०) भाग्यश्री निवासस्थानी विजयाचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा केला. आता राज्यातही परिवर्तन अटळ असल्याचा आत्मविश्वास यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, संपूर्ण भारत देश भाजपमय झाला आहे. देशातील विरोधक म्हणत होते, आता देशात बदल घडणार, मात्र मजबूत बहुमत देऊन जनतेने भाजपकडे सत्ता सोपविली आहे.

आता महाराष्ट्रात व इंदापूरातही परिवर्तन घडणार आहे. इथल्या राज्यमंत्र्यांची लबाडी, फसवणूक आता जनता सहन करणार नाही. शेतकर्‍यांच्या वीज जोडणी साठी तात्काळ निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असे यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

भाजपच्या नेत्रदीपक विजयाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. या विजयी सभेत भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती वनवे यांनी हर्षवर्धन पाटील यांना पेढा भरविला. तर गुलाल उधळीत भाजपचे झेंडे फडकावत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या विजयी सभेला इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button