स्थानिक

अजितदादांच्या जयंतीनिमित्त विशेष मुलांचा स्वच्छतेचा संदेश; शिवगुरू दिव्यांग कार्यशाळेत वृक्षारोपण व विविध उपक्रम

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा अनोखा संदेश; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

अजितदादांच्या जयंतीनिमित्त विशेष मुलांचा स्वच्छतेचा संदेश; शिवगुरू दिव्यांग कार्यशाळेत वृक्षारोपण व विविध उपक्रम

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा अनोखा संदेश; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

बारामती वार्तापत्र 

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कसबा बारामती येथील शिवगुरू दिव्यांग मुलांची कार्यशाळा (प्रवर्ग : मतिमंद) येथे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विशेष मुलांनी आपल्या कृतीतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा प्रेरणादायी संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेत “अजितदादांची बारामती स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा” असा संदेश नागरिकांना दिला. वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मुत्याप्पा व्हनकांबळे, उपाध्यक्ष महेंद्र उंडे, सचिव योजना चव्हाण, मुख्याध्यापिका गौरी भगत (वरे) यांच्यासह प्रज्ञा काटे, संजय सावंत, शौर्या, मानसी जाधव, स्वप्नाली निंबाळकर, सारिका काटकर, सागर व्हनकांबळे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. वरदा, प्रेरणा, वैष्णवी, निकहत, श्रवण, आकाश, संकेत, पार्थ, अष्टलक्ष्मी या विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या शेवटी विशेष मुलांनी दिलेला स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश उपस्थितांच्या मनाला भावला. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक जनजागृती होऊन स्वच्छ, हरित आणि संवेदनशील समाज घडविण्यास निश्चितच हातभार लागेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D