अजितदादांच्या ताब्यात असणाऱ्या बारामती नगर परिषदेत चाललय तरी काय;भाडेकरूंकडून आकारणार घरपट्टी; स्थानिक नागरिकांमध्ये संताप
काही वार्डांमध्ये कोणत्याही प्रकारचा भाडे करूची नोंद नाही,

अजितदादांच्या ताब्यात असणाऱ्या बारामती नगर परिषदेत चाललय तरी काय;भाडेकरूंकडून आकारणार घरपट्टी; स्थानिक नागरिकांमध्ये संताप
आगामी नगरपरिषदेचे इलेक्शन घरपट्टी भोवती फिरणार का?
काही वार्डांमध्ये कोणत्याही प्रकारचा भाडे करूची नोंद नाही
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रशस्त अशी बिल्डिंग उभारण्यात आली आहे.
परंतु या बारामती नगरपालिकेकडून बारामती मध्ये नुकतेच घरपट्टी मोजणीचा कार्यक्रम स्थापत्य कन्सल्टंन यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.यामध्ये सुमारे 70 ते 80 हजार घरांचे मोजणी करण्यात आली आहे? अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच या कंट्रक्शनला सदरील कामाचे कॉन्ट्रॅक्ट पाच वर्षाकरिता दिले आहे.
ह्या कंपनीने बारामतीतील सर्व घरमालक यांच्या घरी जाऊन मोजणी केलेली आहे तसेच काही वॉर्डमध्ये भाडेकरूंची ही घरपट्टी साठी नोंद करण्यात आली आहे.तर काही वार्डांमध्ये कोणत्याही प्रकारचा भाडे करूची नोंद नाही!, तर काही भागांमध्ये भाडेकरून ची नोंद केली आहे.त्यामुळे बारामती मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच नुकतीच बारामती घरपट्टी हरकत घेण्यात आली.याबाबत नागरिकांनी हरकत घेतल्या आहे.पाच ते साडेपाच हजार भाडेकरू लोकांची नोंद लागली होती!.
त्यातील सुमारे चार ते साडेचार हजार लोकांनी हरकत घेतल्यामुळे नगरपालिकेची तारांबळ उडाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोणतेही नगरपरिषदेत अशाप्रकारे भाडेकरूंची घरपट्टी नोंद घेतली जात नाही!.
पण वेगळा पायंडा बारामतीमध्ये पडण्याचा प्रयत्न सुरू आहे.की काय? तसेच ज्या ठिकाणी भाडेकरू आहेत त्या ठिकाणी दुर्लक्ष केले जाते व ज्या ठिकाणी भाडे करू नाहीत त्या ठिकाणची घरपट्टीसाठी मोजणी केली जाते!. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री यांची एक हाती सत्ता असल्यामुळे मनमानी कारभार सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
आगामी नगरपालिका इलेक्शनच्या तोंडावर हा मुद्दा गाजणार आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषद या भाडेकरूंच्या घरपट्टी बाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.