अजितदादांच्या नावे दुसऱ्यांदा फसवणूक,पीएशी ओळख असल्याचा सांगून,दहा लाखांचा गंडा, एकाला अटक
पीडित तरुणाला दहा लाख रुपयांचा चुना लावण्यात आला.
अजितदादांच्या नावे दुसऱ्यांदा फसवणूक,पीएशी ओळख असल्याचा सांगून,दहा लाखांचा गंडा, एकाला अटक
पीडित तरुणाला दहा लाख रुपयांचा चुना लावण्यात आला.
पुणे :प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएचं नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटनेची चर्चा सुरू आहे. अशातच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याचं, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्या एकाची 10 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक खील केली. ही घटना ताजी असताना आता आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका तरुणानं पुणे महानगरपालिकेतील कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली 10 लाखांचा चुना लावला आहे.
काय आहे प्रकरण?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएशी आपली ओळख आहे, असल्याचं खोटं सांगून पुण्यात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणाला दहा लाख रुपयांचा चुना लावण्यात आला.
अजितदादांच्या पीएशी ओळख असल्याचा बनाव
पुणे महापालिकेमध्ये कामाचं कंत्राट मिळवून देतो, असं सांगून तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी माझी ओळख आहे, असं भासवून आरोपीने पीडित तरुणाकडून 10 लाख रुपये उकळल्याची माहिती आहे.
अजितदादांच्या नावे दुसऱ्यांदा फसवणूक
पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रवीण जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे. अजित पवार यांच्या नावाचा दुसऱ्यांदा गैरवापर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.