अजितदादांच्या बारामतीत बावनकुळेंचा शिरकाव श्री सावतामाळी सभागृहास 508 चौ मी जमीन दिली नगरपालिकेला
सिटी सर्वे क्रमांक ९० आणि १२९ मधील एकूण ५०८ चौरस मीटर जमीन

अजितदादांच्या बारामतीत बावनकुळेंचा शिरकाव श्री सावतामाळी सभागृहास 508 चौ मी जमीन दिली नगरपालिकेला
सिटी सर्वे क्रमांक ९० आणि १२९ मधील एकूण ५०८ चौरस मीटर जमीन
बारामती वार्तापत्र
बारामती म्हटलं की पवारांची बारामती असं म्हटलं जात.आत्ताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले आहेत. आता बारामतीतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे.कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे बारामतीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने बारामती शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे.मौजे बारामती येथील श्री.सावतामाळी सभागृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली ५०८ चौरस मीटर शासकीय जमीन बारामती नगरपरिषदेला कब्जेहक्काने (भोगवटादार वर्ग-२) प्रदान करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
सिटी सर्वे क्रमांक ९० आणि १२९ मधील एकूण ५०८ चौरस मीटर जमीन नगरपरिषदेला विनामूल्य न देता,चालू बाजारमूल्य वसूल करून हस्तांतरित केली जाणार आहे.यामुळे शासनाला आर्थिक उत्पन्न मिळेल आणि नगरपरिषदेला सभागृह बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध होईल.या जमीन हस्तांतरणासोबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘श्री.सावतामाळी सभागृहाच्या बांधकामामुळे बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.हा प्रकल्प शहराच्या विकासात मोलाची भर घालेल.असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले.