स्थानिक

अजितदादांच्या बारामतीतील अपघाताचा’तो’ व्हिडीओ समोर, खाली पडलेलं विमान, लोकांची गर्दी, इतक्यात ,मोठा स्फोट

5 जणांचा मृत्यू झाला

अजितदादांच्या बारामतीतील अपघाताचा‘तो’ व्हिडीओ समोर, खाली पडलेलं विमान, लोकांची गर्दी, इतक्यात ,मोठा स्फोट

5 जणांचा मृत्यू झाला

बारामती वार्तापत्र 

२८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येण्यासाठी विमानाने निघाले होते.

विमान बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनिला धडकलं. विमान जमिनिला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आग लागली. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याचे आतापर्यंत दोन व्हिडीओ समोर आले आहेत. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या अपघाताचा दुसरा जो व्हिडीओ होता, त्यामध्ये विमान हवेतच तिरकं झाल्याचं पहायला मिळत होतं, त्यावरून अनेकांनी या अपघाताबद्दल शंका देखील उपस्थित केली होती, दरम्यान आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्या शिवाय राहाणार नाही. शिवाय या स्फोटानंतर काय झालं असेल याची कल्पना ही येते. हा नवा व्हिडीओ सध्या सगळीकडे जबरदस्त व्हायरल होत आहे.

बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे २८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या विमानाता अपघात झाला आहे ही बातमी वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर अजूबाजूच्या गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा स्फो जबरदस्त होता. तो झाल्यावर गावकऱ्यांनी ही तिथून पळ काढला.

या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला व आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या विमानाचा स्फोट झाला त्यावेळी गावकरी तिथे होते. त्या पैकी एकाने विमान जळत असल्याचा व्हिडीओ तयार केला.

त्याला त्यावेळी काही स्फोट होईल अशी कल्पना नव्हती. तो अगदी विमानाच्या जवळ होता. त्याच वेळी जोरात स्फोट झाला. त्यामुळे जवळ असलेलो लोक आणि व्हिडीओ काढणारी व्यक्ती तिथून पळत सुटली. व्हिडीओमध्ये या सर्व गोष्टी शुट झाल्या आहेत. हा व्हिडीओ आता समोर आला आहे. यात विमानाला प्रचंड आग लागल्याचे दिसत आहे. शिवाय लोकांचा आरडाओरडा आणि पळापळ ही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काळजाचा ठोका चुकल्या शिवाय राहात नाही.

Back to top button