अजितदादांनी भर सभेत जिल्हा परिषद-पंचायत समिती युतीबाबत काय सांगितले बारामती नगरपालिकेचे दिले उदाहरण”
“नको वाद घालायला”असा धोरणात्मक निर्णय घेतला.

अजितदादांनी भर सभेत जिल्हा परिषद-पंचायत समिती युतीबाबत काय सांगितले बारामती नगरपालिकेचे दिले उदाहरण”
“नको वाद घालायला”असा धोरणात्मक निर्णय घेतला.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की,कितीही अडचणी आल्या तरी कामात अडथळा आणू नका,अफवा किंवा हलक्या कानाचा होऊ नका, आणि कोणाची गंमत करायचा भानगडीमधे पडू नका.निवडणुकीत कामात सामंजस्य आणि सहकार्य आवश्यक आहे, कारण विरोधी भूमिकेमुळे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचाराच्या शुभारंभवेळी पवार बोलत होते.
पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की,पंचायत समिती निवडणुकीत १२ जागा होत्या. काही सहकाऱ्यांनी प्रस्ताव ठेवला की एक सर्वसाधारण महिला उमेदवार द्यावी आणि दुसरी जागा त्यांना देण्यात यावी, तर उर्वरित १० जागा तुम्ही लढवा.यामध्ये सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे आणि परस्पर विरोध टाळावा,असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी नगरपालिकेतील निवडणुकीबाबत सांगितले की,बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीला सुनील सस्ते आणि विष्णू चौधर यांनी विरोध केला होता,पण नंतर योग्य प्रकारे सामंजस्य साधून योग्य उमेदवारांना साथ दिली गेली.माळेगावमध्येही त्यांनी असेच केले,तिथे त्यांनी “नको वाद घालायला”असा धोरणात्मक निर्णय घेतला.
पवार म्हणाले की,यांच्यामध्ये माझा स्वार्थ नाही; ते फक्त राजकीय व्यवस्थापन योग्य प्रकारे पार पडावे, यासाठी हे निर्णय घेत आहेत.तसेच सगळ्यांनी योग्य नियोजन, सहकार्य आणि संयमाने काम केल्यास निश्चित यश मिळू शकते,आणि कुणीही नाराज होऊ नये.असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
काहीजणांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अजित पवारांना १८ उमेदवार मिळाले नाहीत, अशा अफवाही पसरवल्या जात आहेत. केंद्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आहोत, तर राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी आहोत. यापूर्वी माळेगावच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
कमी लेखण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण त्यामुळे आम्हालाही स्वतंत्रपणे मैदानात उतरावे लागले. समोरच्या काही सहकारी मित्रांनी दोन पंचायत समिती जागांची मागणी केली होती, तर उर्वरित पंचायत समिती व जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात, अशी चर्चा झाली होती. मात्र, एकमेकांना विरोध करून काहीही साध्य होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, असे पवार यांनी ठामपणे सांगितले.






