अजितदादांनी शब्दशः कपाळाला हात मारुन मोठी चूक लक्षात आणून दिली 

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव कोनशिलेवर कोरताना चूक झाली होती.

अजितदादांनी शब्दशः कपाळाला हात मारुन मोठी चूक लक्षात आणून दिली 

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव कोनशिलेवर कोरताना चूक झाली होती.

प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार  यांनी उद्घाटनाच्या कोनशिलेवर असलेली एक मोठी चूक लक्षात आणून दिली. ती पाहून अजितदादांनी शब्दशः कपाळाला हात मारुन घेतला.

बरं ही चूक कोणा साध्या-सुध्या इसमाच्या नावातील नव्हती, तर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावात केली होती. हसन मुश्रीफ यांचं नाव चक्क ‘हसन मुस्त्रीफ’ असं लिहिण्यात आलं होतं.

नेमकं काय घडलं?

तर त्याचं झालं असं, की अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला. यावेळी संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर याच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

काय होती चूक?

यावेळी अजित पवारांनी उद्घाटन केल्यानंतर कोनशिलेवर असलेल्या नावातील एक मोठी चूक लक्षात आणून दिलीय. कोनशिलेवर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये झालेली शाब्दिक चूक अजितदादांनी दाखवून दिली आणि कपाळावर हात मारुन घेतलाय. या कोनशिलेवर मुश्रीफऐवजी ‘मुस्त्रीफ’ अशी शब्दरचना करण्यात आली होती.

कोण आहेत हसन मुश्रीफ?

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते
महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री
मुश्रीफ हे कोल्हापूरमधील कागल मतदारसंघातून आमदार
आघाडी सरकारच्या काळात कामगार मंत्रालयाची धुरा
66 वर्षीय हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय

Related Articles

Back to top button