अजितदादां च्या बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वीस.
प्रशासन चे बारीक लक्ष असून सुद्धा पॉझिटिव्ह आकडा वाढतोय,चिंतेची बाब.
अजितदादां च्या बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वीस.
प्रशासन चे बारीक लक्ष असून सुद्धा पॉझिटिव्ह आकडा वाढतोय,चिंतेची बाब.
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन , बारामती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढू नये म्हणून नागरिकांची काळजी घेत असताना आज गुरुवार ४ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वीस वर पोचली आहे.त्यामुळे प्रशासन च्या चिंता मध्ये भर पडली आहे.
बारामती तालुक्यातील कोहाळे येथील कोरोनाबाधित ज्येष्ठाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून आता बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २० वर पोचला आहे.
चार दिवसांपूर्वी कोहाळे बुद्रक येथील ९० वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. त्या कुटुंबातील मुलगा, पत्नी, नातू या सायांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी मुलगा व नातू यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र आज त्यांच्या ७५ वर्षीय पत्नीचा मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोहाळेतील कोरोनाबाधितांचा आकडा आता २ वर आणि बारामती तालुका २० वर पोचला आहे. सर्व प्रशासन उत्कृष्ट काम करत असताना नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासन च्या वतीने करण्यात येत आहे.