स्थानिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमआयएमबाबतच्या आघाडीचा प्रस्ताव धुडकावला!

कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, परंतू ज्यांच्यासोबत जायचं आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमआयएमबाबतच्या आघाडीचा प्रस्ताव धुडकावला!

कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, परंतू ज्यांच्यासोबत जायचं आहे.

बारामती वार्तापत्र

एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, परंतू ज्यांच्यासोबत जायचं आहे. त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार बारामीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

पवार यांना एआयएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारली असता पवार यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. पवार म्हणाले की, कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. मात्र ज्यांच्या सोबत जायचे आहे, त्या पक्षांनी तर होय म्हटले पाहिजे. आणि हा राजकीय निर्णय आहे.

हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता कोणी प्रस्तावित केला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारच्या राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या संबंधित निर्णय घेऊ शकता हे तो पर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केले नाही, तो पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाही. महाराष्ट्राच दोन दिवस मी हे वर्तमानपत्रात वाचत आहे. मात्र, अशा प्रकारचा कोणताही निर्णय नाही.

‘पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न’ –

पुरंदर विमानतळासाठी एक जागा जवळपास निश्चित झालेली असून त्याला जवळपास सर्व विभागांनी मान्यता दिली आहे. त्या जागेच्या बाबत संरक्षण खात्याची काही मते आहेत. ही मते विमानतळाच्या अनुषंगाने दुर्लक्षित करता येत नाहीत. त्यामुळे यासंबंधीचा निर्णय घेण्यातप्रत आलेली यंत्रणा सध्या थांबली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी देशाचे संरक्षणमंत्री आणि संबंधित विभागातील यंत्रणांसोबत राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन निर्णय घ्यावा, हा आग्रह आम्ही दिल्लीत जाऊन करणार आहोत, असेही पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button