अजित दादांना हवा आहे 28 ते 30 वर्ष वयाचा अध्यक्ष
युवक च्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आहे.आणी अजितदादा उपमुख्यमंत्री पदी विराजमान आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणत्याही विंगचा अध्यक्ष होणे यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच चुरस असते. त्यातही हे पद जर बारामती तालुक्याशी निगडीत असेल तर त्यालाही महत्त्व प्राप्त होते.
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विद्या प्रतिष्ठान येथे सकाळी मीटिंगसाठी आले होते. मीटिंग संपल्यावर युवकच्या काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अजित दादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शहराध्यक्ष पदासाठी निवेदन दिले.
यावेळी अजितदादांनी मला 28 ते 30 वर्ष वयाचा अध्यक्ष बारामती शहर साठी हवा आहेअसे सांगीतले. त्यावर कार्यकर्त्यांनी सांगितले की दादा आत्ताचे अध्यक्ष सुद्धा चाळीस वर्ष वयाचे आहेत.जर 28 ते 30 ही वयोमर्यादा ठरलीअसेल तर आत्ताचे विद्यमान अध्यक्ष ही या पदासाठी अपात्र आहेत. त्यांना बदलून नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी अशी मागणी सर्व युवकांच्या मधून होत आहे.
त्यामुळे अजित दादा आता नेमकी कोणती भूमिका घेणार व कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालणार त्याकडे समस्त बारामतीकर युवकांचे लक्ष लागून राहिले आहे.