अजित पवारांचा दावा श्रीनिवास पवार यांनी फेटाळला; म्हणाले – ‘आईला जसा दादा तसा युगेंद्रही नातू आहे, आई तसं म्हणली असेल असं वाटत नाही’
आई सांगते माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभा करू नका.
अजित पवारांचा दावा श्रीनिवास पवार यांनी फेटाळला; म्हणाले – ‘आईला जसा दादा तसा युगेंद्रही नातू आहे, आई तसं म्हणली असेल असं वाटत नाही’
आई सांगते माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभा करू नका.
बारामती वार्तापत्र
यंदाची बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लोकसभा निवडणुकीप्रमाणं हायव्होल्टेज ठरत आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला होता.
आता विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे.
आज अजित पवारांनी बारामतीकरांशी संवाद साधला दरम्यान बोलताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ” मागे मी चूक केली, आता चूक कुणी केली? आई सांगते माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभा करू नका. तुटायला वेळ लागत नाही. फॉर्म भरायला कुणी सांगितला तर साहेबांनी सांगितला. म्हणजे साहेबांनी आमच्या तात्यासाहेबांचं घर फोडलं का म्हणत अजित पवार भावूक झाले.
ते पुढे म्हणाले,” लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हता द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला असं समीकरण होतं. दादा म्हणजे हा दादा नाही तर लोकांना वाटेल तो दादा, असंही अजित पवार यांनी म्हंटले.
आपल्या आईने युगेंद्र पवारांना निवडणूक लढवण्याला विरोध केला होता, हा अजित पवारांचा दावा त्यांचे सख्खे बंधू आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी फेटाळला आहे. आपल्या आईने कोणतेही भाष्य केले नाही म्हणत अजित पवारांनी आता लोकसभेला त्यांच्याकडून चुक झाल्याची कितीही वेळा कबुली दिली तरी युगेंद्र पवारांची उमेदवारी कायम राहणार असल्याचे भाष्य श्रीनिवास पवारांनी केले आहे. आईला जसा दादा तसा युगेंद्रही नातू आहे, आई तसं म्हणली असेल असं वाटत नाही, असे भाष्य त्यांनी केले.
श्रीनिवास पवार म्हणाले, ” दादांना पोटतिडकीनं सांगत होतो की चूक करु नको. ती आपली लहान बहीण आहे, तिला आपण अंगा-खांद्यावर खेळवलं आहे. तिनं पहिलं पाऊल आपल्यासमोर टाकलंय, तू चूक करु नको, असं अजितदादांना सांगितलं होतं”, असं श्रीनिवास पवारांनी म्हंटले आहे.