सोमेश्वर

अजित पवारांची गाडी एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर पुन्हा घसरली,मीच निधी दिला नाही तर तो काय घंटा करणार’ 

या वक्तव्यानंतर मात्र काही काळ कार्यकर्त्यांना हसू आवरेना झालं.

अजित पवारांची गाडी एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर पुन्हा घसरली,मीच निधी दिला नाही तर तो काय घंटा करणार’ 

या वक्तव्यानंतर मात्र काही काळ कार्यकर्त्यांना हसू आवरेना झालं.

बारामती वार्तापत्र

बारामतीयेथे रविवारी एका उद्घाटन कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार  बोलत होते. ते म्हणाले, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा निरा-बारामती रस्ता महत्त्वाचा आहे. बांधकाम खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे येथे उपस्थित आहेत. दत्तामामा तुम्ही नुसता इंदापूर तालुक्याकडे लक्ष देऊ नका. मलादेखील या बाबाला विनंती करावी लागते, आमच्या तालुक्यातील रस्त्यांनाही निधी द्या. अजित पवार पुढे म्हणाले, बांधकाम खात्याच्या चाव्या जरी दत्तामामाच्या हातात असल्या तरी वित्तमंत्री म्हणून त्यांच्या निधीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच निधी दिला नाही तर तो काय घंटा करणार’ असे व्यक्तव्य केले आहे.

…तर काय देणार घंटा?

त्या भागातील निधी वाटपाबाबत बोलतना अजित पवार आज पुन्हा घसल्याचे पहायला मिळालं. विषय होता निधीवाटपाचा ती सगळी सुत्र सध्या आमदार दत्ता भरणे यांच्याकडे सोपण्यात आली आहे. त्यामुळे मामा इतर आमदारांचाही विचार करत जा, इतरांनाही निधी, असे सांगताना अजित पवार म्हणाले. मलाही भरणेंना निधी मागावा लगतो. कारण इथल्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले. इथल्या तिजोरीच्या चाव्या भरणेंच्या हातात असल्या तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? अजित पावारांनी असे म्हणताच समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमद्ये हशा पिकला. त्यानंतर सावरत अजित पवारांनीच मान्य केलं की आता बोलता बोलता गाडी घसरायला लागली आहे. आणि पुन्हा ते ट्रॅकवर आले

पवार यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार हशा पिकला खरा परंतु आपल्या विधानामुळे वाद होवू शकतो हे लक्षात येताच, ‘गाडी घसरायला लागली.आता थांबतो,’ असे म्हणत पवार यांनी भाषण

समता नागरी पतसंस्थेच्या समता पॅलेस वास्तूच्या उदघाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते.

पवार म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता भरणे मंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. दत्ता भरणे यांना मला आमच्याही.बारामती तालुक्यावर लक्ष द्या असे सांगावे लागते. मला काही तरी द्या, अशी विनंती करावी लागते. ‘बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. त्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. मी तिजोरीच उघडली नाही तर त्यांना काय ‘घंटा’ मिळणार?’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram