मुलींची हॉस्टेल फी परत करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने टी.सी कॉलेजच्या प्राचार्यांना निवेदन
प्राचार्यां चंद्रशेखर मुरूमकर सर यांनी यावर योग्य तो समान मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे.

मुलींची हॉस्टेल फी परत करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने टी.सी कॉलेजच्या प्राचार्यांना निवेदन
प्राचार्यां चंद्रशेखर मुरूमकर सर यांनी यावर योग्य तो समान मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वस्तीगृहातील मुलींची महाविद्यालयाने या कोरोनाच्या महामारीच्या काळात शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये फक्त एक आठवडा कॉलेज सुरू असताना सहा महिन्यांची फी वसूल केलेली आहे.
महाविद्यालयाने त्यांना 10% फी वसूल करून उर्वरित 90% फि त्यांना परत करून असे सांगितले होते. नंतर काही काळानंतर कॉलेज त्यांना 20% फी घेऊन बाकी उर्वरीत 80% फी परत करू असे सांगू लागले आणि आता फी देताच येणार नाही असे सांगत असल्याचे निदर्शनास येत आहे.
विद्यार्थीनींनसोबत सोबत करत असलेल्या फसवणुकीचे आणि मुलींना टोलवा तोलविची उत्तरे देणाऱ्या शिक्षकांचे सर्व पुरावे संघटनेकडे असून महाविद्यालयाने येत्या दहा दिवसात मुलींना त्यांचे पैसे परत करावे आणि दिलेल्या निवेदनावर केलेल्या कार्यवाहीचा कार्यअहवाल लेखी स्वरूपात द्यावा अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे.
प्राचार्यां चंद्रशेखर मुरूमकर सर यांनी यावर योग्य तो समान मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे. परंतु महाविद्यालयाने मागणी लवकरात लवकर पुर्ण न केल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलन महाविद्यालया विरोधात असलेले सर्व पुरावे सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि सर्व मुलींना घेऊन महाविद्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा संघटनेच्या वतीने रोहित भोसले यांनी दिला.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, शहर अध्यक्ष विनय दामोदरे, महाविद्यालय प्रतिनिधी विपुल सोनवणे तसेच संघटनेचे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.