अजित पवारांनी केली राज ठाकरे यांची नक्कल! खिल्ली उडवत सोडले टीकास्त्र
नॅपकिनने तोंड पुसत केली राज ठाकरेंची नक्कल.

अजित पवारांनी केली राज ठाकरे यांची नक्कल! खिल्ली उडवत सोडले टीकास्त्र
नॅपकिनने तोंड पुसत केली राज ठाकरेंची नक्कल.
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणासाधत त्यांच्यावर पुन्हा एकदा जातीयवादाचा शिक्का मारला. या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेते राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला आहे. विविध राजकीय नेत्यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरे यांची नक्कल करत अजित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
सगळ्या सभा संध्याकाळीच घेतात. एखादी सभा दुपारी का घेत नाहीत? – येवल्यातील शिवसृष्टी भुमिपुजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकला आले होते. यावेळी ते राष्ट्रवादीच्या मुंबईनाका येथील कार्यालयात बोलत होते. यावेळी अजित पवारांनी मनसेच्या सभेतील आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पवार जातीयवादी आहे की नाही, हे नाशिककरांना माहित आहे. रामदास आठवले, राजू शेट्टी यांनी देखील सांगितले की पवार जातीयवादी नाही. कालच्या सभेत फक्त शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी कोणाचे नाव घ्यायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मागील काळात राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. आम्ही एखाद्याच कौतुक केले आणि नंतर टीका करायचे म्हटले तर जीभ पण वळत नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. यांना काही घेणे देणे नाही. सगळ्या सभा संध्याकाळीच घेतात. एखादी सभा दुपारी का घेत नाहीत? कधी तरी पंधरा दिवसातून एक सभा तिही संध्याकाळी घ्यायची, अशी खिल्ली त्यांनी राज ठाकरेंची उडवली.
अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल
राज ठाकरे कधी दुपारी भर उन्हात सभा घेत नाहीत. सूर्य मावळला, संध्याकाळ झाल्यानंतर वातावरण चांगले झाले की मग हे सभा घेतात. मग ते नॅपकिनने तोंड पुसत असतात. ( यावेळी अजित पवार यांनी नॅपकीन मागवला आणि राज ठाकरे यांची तोंड पुसण्याची नक्कल केली) ते काय पुसत असतात काय माहीत. काय शिंकरायचे आहे ते एकदाच शिंकरून घ्या ना, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.
शरद पवार यांचं काम
सत्ता गेली तरी बेहत्तर पण शरद पवार यांनी शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच चाक उलटं फिरु दिलं नाही. सत्तेसाठी शरद पवार कधीच हापापलेले नव्हते. चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. १० वर्ष देशाचे कृषी मंत्री होते. माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याला वेगवेगळ्या योजना देता आल्या पाहिजे, शेततळी देता आली पाहिजे अशा प्रकारची भूमिका शरद पवार यांनी स्विकारली.
फुले, शाहु,आंबेडकर यांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? भुजबळांचा राज ठाकरेंना टोला
तर, लोकमान्य टिळकांचा त्याग मोठा आहे. तो विसरता येऊ शकत नाही मात्र त्यांच्या नावाने खोटा इतिहास सांगितलं जात आहे दिल्लीपासून महाराष्ट्राप्रर्यंत खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहे त्यांना काम करू द्या, असा सल्लावजा टोला भुजबळांनी राज ठाकरेंना लगावला.
शरद पवार शिवाजी महाराजांचा नाव घेत नसल्याचा आरोप राज ठाकरे करतात, आम्ही तर त्यांचा नाव नेहमीच घेतो मात्र तुम्ही फुले, शाहु,आंबेडकर यांचा नाव का घेत नाही त्यांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केला.