स्थानिक

अजित पवारांनी केले मोबाईल क्लिनिक व्हॅनचे चे उद्घाटन

बारामती शहरातील नागरिकांची मोफत तपासणी करून औषधेही मोफत देण्यात येणार आहेत.

अजित पवारांनी केले मोबाईल क्लिनिक व्हॅनचे चे उद्घाटन

बारामती शहरातील नागरिकांची मोफत तपासणी करून औषधेही मोफत देण्यात येणार आहेत.

बारामती वार्तापत्र

मा.हिराभाई बुटला विचारमंच यांच्याकडून फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक व्हॅन) चे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुटाला विचारमंचाचे कौस्तुभ बुटाला आणि प्रतिभा हांडेकर हे उपस्थित होते. या फिरत्या दवाखान्यामार्फत बारामती शहरातील नागरिकांची मोफत तपासणी करून औषधेही मोफत देण्यात येणार आहेत. तसेच दाना इंडिया टेक्निकल सेंटर प्रा.लि. हिंजवडी, पुणे यांच्या CSR फंडातून व मिलिंद वालवाडकर यांच्या प्रयत्नातून बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयास मिनी व्हेंटिलेटर (पोर्टेबल बायपास) देण्यात आले. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दीपेश राव, अमेरिका यांच्याकडून म्युकर मायकोसिस साठी लागणाऱ्या इंजेक्शन चे 25 डोस रुई ग्रामीण रुग्णालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, रूई ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button