राजकीय

अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा व उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – काळुराम चौधरी

पद व गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांकडे केली कारवाईची मागणी...

अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा व उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – काळुराम चौधरी

पद व गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांकडे केली कारवाईची मागणी…

बारामती वार्तापत्र 

२०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० मधील पद व गोपनीय शपथेचा भंग केल्याप्रकरणी दिनांक १६/०९/२०२५ रोजी महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व माननीय विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे कायदेशीर व योग्य कारवाईची मागणी बहुजन समाज पार्टीच प्रदेश महासचिव श्री काळुरामजी चौधरी यांनी रजिस्टर पोस्टाने व ईमेल द्वारे केलेली आहे.

वारामती येथे दिनांक ०५/०९/२०२५ रोजी ओबीसी बहुजन आक्रोश एल्गार मोर्चाचे आयोजन केलेले होते, या मोर्चामध्ये मी बहुजन समाज पार्टीचा पतिनिधी म्हणून उपस्थित होतो या मोचत्चि आयोजन ओबीसी बहुजन आक्रोश समितीने केलेले होते त्यासाठी रीतसर परवानगी करिता अर्ज देखील दिलेला होता, सदर मोर्चाच्या आयोजनामध्ये माझा यथार्थ कोणताही हितसंबंध नव्हता व नाही. मी सदर मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बहुजन समाज पार्टीचे नेतृत्व करीत असल्यामुळे मी स्वतः सदर सांगता सभेमध्ये भाषण करून प्रस्थापितांच्या विरूद्ध भाषण केले हे मला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. सदर आकोश मोर्चामुळे कुठलीही कायदा व गुव्यवस्थेचा पश्न उपस्थित न होता, शांततेने मोर्चा पार पडला असे असताना केवळ प्रस्थापित लोकांच्या विरोधात मोर्चा काढला माणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या सांगणे वरून वारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी यांनी तोंड पाहून ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. सदर मोर्चामध्ये दहा ते पंधरा हजार व्यक्ती समूह हजर असताना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) कार्यकर्ते हजर असताना माझ्या वरीवर राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गटाच्या) नेत्यांनी सुद्धा भाषण केले असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता माझ्यावर आकसापोटी अजित पवार यांच्या सांगण्यावरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंवर ३२९/२५ दाखल केलेला आहे.

मी व्यक्तीशः गेली २० ते २५ वर्ष वारामती विधानसभा, लोकसभा निवडणुकीत श्री. अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलेली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सन २००४, २००९, २०१४, २०१९ व २०२४ ला देखील मी स्वतः व उमेदवार उभे केलेले आहेत व लोकसभा निवडणूक सन २००४, २००९, २०१४, २०१९ व २०२४ ला देखील मी स्वतः व उमेदवार देखील उभे केलेले आहेत मागील सन २०२४ च्या लोकसभा निवडणूक मध्ये श्री अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या विरोधात माझ्या पक्षाचा उमेदवार दिलेला होता.

त्यामध्ये निरनिराळया टीव्ही चॅनेलच्या डिवेटमध्ये मी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेऊन विकासाच्या नावावर सूरू असलेला भ्रष्टाचार मलिदा गैंग हा शब्दप्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेला होता त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाचक्की झाली आणि त्यामध्ये त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला या रागातून अजित पवार यांनी राजकीय आकसापोटी माझ्यावरती बोटा गुन्हा दाखल करण्यास बारामती पोलिसांना सांगून आपल्या पदाचा गैरवापर करून, पद व गोपनीयता शपथेचा भंग केल्याने त्यांची आमदारकी व मंत्रीपद रद्दबातल ठरवण्यात यावे व त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हाकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी महामहीम राज्यपाल व माननीय विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी केलेली आहे.

Back to top button