राजकीय

अजित पवारांनी स्वतःच सांगितल पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द?

राज्याचे अॅडिशनल चिफ सचिव, आयुक्त आणि इतर मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

अजित पवारांनी स्वतःच सांगितल पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द?

राज्याचे अॅडिशनल चिफ सचिव, आयुक्त आणि इतर मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुणे ;प्रतिनिधी

अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले,मला या व्यवहाराची माहिती नव्हती. शेवटी आरोप करणे सोपे आहे. पण परिस्थिती काय आहे हे जनतेला कळलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की या व्यवहारामध्ये एकही रुपयाही दिला नाही. मोठ मोठे आकडे सांगितले गेले. विरोधकांनी आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं.पण यात एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही. जो काही व्यवहार केला होता तो रद्द करण्यात आला आहे .

राज्याचे अॅडिशनल चिफ सचिव, आयुक्त आणि इतर मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त नागपूर, मुद्रांक शुल्क विभाग यांच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करून एक महिन्याच्या आता हा अहवाल सादर करण्याचं सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

आता हा व्यवहार आम्ही पाहिला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं नाही. ते नागपूरला आहे. त्यावेळी फोनवर संवाद साधला. मी त्यांना सांगितला, माझ्या घरातील जवळचा माणूस असला तरी नियमाप्रमाणे चौकशी करा, समिती स्थापन करायची असेल तर करावी. मला त्या गोष्टीला पाठिंबा राहिल, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले,माझ्या ३५ वर्षांच्या काळामध्ये नियम सोडून कधी काम केलं नाही. माझ्यावर जल सिंचन प्रकरणात आरोप झाले. त्याच श्वेतपत्रिकाही काढली होती. पण हाती काही आलं नाही. या प्रकरणाची अजिबात मला माहिती नव्हती. जर मला माहित असतं तर मी लगेच सांगितलं असतं. कुठलाही व्यवहार केला, तर मी सांगत असतो, सगळी माहिती घेऊनच व्यवहार करा. नियमाने व्यवहार करा.

Back to top button