अजित पवारानी आपल्या भाषणात उल्लेख केलेले कोण आहेत सुनील सस्ते?ज्यांची चर्चा नगरपालिका निवडणुकीत राज्यात होयची?
विकासासाठी भांडायचे असेल तर ते एकत्र येऊन भांडू.

अजित पवारानी आपल्या भाषणात उल्लेख केलेले कोण आहेत सुनील सस्ते?ज्यांची चर्चा नगरपालिका निवडणुकीत राज्यात होयची?
विकासासाठी भांडायचे असेल तर ते एकत्र येऊन भांडू.
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये राष्ट्रवादी पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराची धडक सुरुवात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नारळ फोडून झाली. या कार्यक्रमात अजितदादांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट भाष्य करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला उमेदवारी का दिली याचा त्यांनी स्पष्ट खुलासाही केला.
मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांच्या उमेदवारीसंबंधी केलेल्या वक्तव्याची. गेले तीस वर्ष पारंपरिक विरोध कायम ठेवणाऱ्या सस्तेंबाबत अजितदादांनी अनपेक्षित मत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, “सुनील समोरच्या बाकावर बसून वर्षानुवर्षे विरोध करीत होता. पण आम्ही कुणाचाही बांध रेटत नव्हतो. मीच त्याला सांगितले-एकट्याने विरोध करण्यापेक्षा चला एकत्र येऊया. विकासासाठी भांडायचे असेल तर ते एकत्र येऊन भांडू.” या वक्तव्यामुळे बारामतीत या चर्चेला उधाण आले.
सुनील सस्तेंना उमेदवारी देण्यामागचे कारण.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांनी सस्तेंच्या परखड आणि आक्रमक भूमिकेमुळेच त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील सस्ते हे सलग पाच टर्मपासून नगरसेवक म्हणून विजयी होत आहेत. अनेक दिग्गजांना त्यांनी पराभूत केले असून बारामतीत त्यांची प्रतिमा जनसेवक म्हणून ओळखली जाते.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी नागरिकांना मोठा आधार दिला. लसीकरणासाठी लोकांना होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून त्यांनी अनेक नागरिकांना मदत केली. कोणत्याही समस्येसाठी ते २४ तास उपलब्ध असल्याने जनमानसात त्यांची पकड घट्ट आहे.
अजितदादांची रणनीती?.
दरवर्षी पॅनलमार्फत लढा देणाऱ्या पारंपरिक विरोधकांना आपल्या गोटात आणत बारामतीतील राजकारण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केल्याचे बोलले जाते. राज्यातील इतर नगरपालिकांना अधिक वेळ देणे, तसेच स्थानिक पातळीवरील विरोध कमी करणे हा यामागील हेतू असल्याचेही सांगितले जाते.
आता सर्वांच्या नजरा सस्तेंच्या भूमिकेकडे.
आगामी काळात सुनील सस्ते किती आक्रमक भूमिका घेणार?पक्षात त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार?हे पाहण्यासाठी बारामतीचे राजकारण उत्सुक आहे. अजितदादांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






