अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी ते होम क्वारंटाइन झाले होते.
अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी ते होम क्वारंटाइन झाले होते.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा करून आल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी करोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. मात्र, घरातून त्यांचं कार्यालयीन कामकाज सुरू होतं.
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्राऊंड लेव्हलला काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अगदी कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते ग्राऊंड लेव्हलला काम करत होते. त्यांनी नुकताच अतिवृष्टीचा फटका बसलेल्या काही भागांचीही पाहणी केली. त्यांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.
अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारने या वृत्ताचे खंडन केले आहे. त्याने अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.