अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ,बारामतीत पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा जल्लोष
स्क्रीनवर शपथविधीचे प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ,बारामतीत पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा जल्लोष
स्क्रीनवर शपथविधीचे प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली
बारामती वार्तापत्र
अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भिगवण चौकात फटाके फोडून, मिठाईवाटप करत जोरदार जल्लोष केला.
गुरुवारी (दि. 5) सकाळपासूनच शहरात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये दिसत होता. शारदा प्रांगण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर तसेच भिगवण चौकामध्ये किरण इंगळे मित्र परिवाराच्या वतीने सकाळपासूनच स्क्रीनवर शपथविधीचे प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती.
सायंकाळी 5 वाजता नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘अजितदादा जिंदाबाद’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकले. तर फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवली.
या वेळी राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष अविनाश बांदल, कुंदन लालबिगे, अॅड. धीरज लालबिगे, आदित्य हिंगणे, सूरज देवकाते, नीलेश जाधव, इफतेखार अत्तार, मेघराज संतोष माने, शफिक शेख, रमेश कोकरे, परवेज सय्यद, माऊली काळे, सचिन नगरे, सुधाकर माने, भारतीय जनता पार्टीचे संतोष जाधव, पिंकी मोरे आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या या वेळी उपस्थित होत्या.