राजकीय

अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड होण्याची शक्यता!

अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्य

अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड होण्याची शक्यता!

अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्य

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संघटनेत जय पाटील यांनी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शहर अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

किरण इंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी सक्रियपणे जोडलेले असून, त्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युवकांमध्ये त्यांची चांगली पकड असून, संघटनात्मक कामाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. यापूर्वी त्यांनी शहरातील सामाजिक, राजकीय तसेच जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडली आहे.

अजित पवार गटाकडून सध्या बारामतीत संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष दिले जात आहे. शहर पातळीवर प्रभावी नेतृत्व देण्याच्या दृष्टीने किरण इंगळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. वरिष्ठ नेत्यांचाही त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, किरण इंगळे यांच्या निवडीमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. शहरातील राजकारणात या नियुक्तीमुळे नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

Back to top button