अजित पवार: मुख्यमंत्रिपदाची हुलकावणीच पण सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन विक्रम
राजकीय कारकिर्द एकदा पाहाच.
अजित पवार: मुख्यमंत्रिपदाची हुलकावणीच पण सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन विक्रम
राजकीय कारकिर्द एकदा पाहाच.
बारामती वार्तापत्र
अजित पवार आज गुरुवारी (12 डिसेंबर) सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन विक्रम रचणार आहेत. पंधराव्या विधानसभेसाठीचा शपथविधी आज आझाद मैदानावर होणार आहे.
2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुसंख्य आमदार घेऊन अजित पवार सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाले. सध्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या असून शरद पवार गटाने दहा जागांवर विजय मिळवला आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या ग्रँड शपथविधी सोहळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेणारे एकमेव नेते ठरले आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन , रक्षामंत्री राजनाथ सिंह , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच शाहरुख खान, सलमान खान यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.
अजित पवार सलग आठव्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणून आले आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा तब्बल 1 लाखांच्या फरकाने पराभव केला होता.
अजित पवार यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा 2012 मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
तर आज 6 डिसेंबर रोजी त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतुत्वाखालील सरकारमध्ये सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एकूण 7.20 लाख रुपये रोख असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6,65,400 रुपये रोख आहेत. तर अजित पवार यांनी बँकेत ठेवीच्या रुपात 3 कोटी 9 लाख 69 हजार 53 रुपये ठेवले आहे आणि त्यांची पत्नी सुनेत्र पवार यांच्या बँक खात्यात 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपये असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली होती.
राज्यात दुसऱ्यांदा महायुती सरकारची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत 288 पैकी 236 जागांवर विजय मिळावला आहे. यामध्ये भाजपला 231, शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाले आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 जागांवर विजय मिळाला आहे.
अजित पवारांचा आजपर्यंतचा प्रवास
बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त.
सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था, पुणे
रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष – ऑगस्ट 2006 ते 19 ऑगस्ट 2018.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष – सप्टेंबर 2006 पासून
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च 2013 पासून
सेवादास संचालक : महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर 2005 ते मार्च 2013 आणि 25 नोव्हेंबर 2018 पासून अध्यक्ष म्हणून काम करत आहे.
पूर्वीच्या विधानसभा / विधानपरिषद / लोकसभा / राज्यसभेचे सदस्य आणि संसद सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
लोकसभा सदस्य : जून 1991 ते सप्टेंबर 1991विधानसभा सदस्य : 1991 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते सप्टेंबर 2014, 2014 ते 26 सप्टेंबर 2019. २०१९ ते २०२४
राज्य/केंद्रीय मंत्री/राज्यमंत्री म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992
पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993
पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004
ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता : नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९.
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014
उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019
उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022
विरोधी पक्षनेते : ४ जुलै 2022 ते ३० जून 2023
उपमुख्यमंत्री : २ जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024
अजित अनंतराव पवार यांचे प्रोफाइल
नाव : अजित अनंतराव पवार
जन्मतारीख:22 जुलै 1959
जन्मस्थान: देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा
शिक्षण: बी.कॉम
ज्ञात भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
व्यवसाय: शेती
पत्नीचे नाव: पत्नी – सौ.सुनेत्रा अजित पवार
मुले: २
मुलगे – पार्थ आणि जय