अजित पवार यांनी आज अधिका-यांची झाडाझडती घेतली.
दिवाळीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे तातडीने सुरु करुन पूर्ण करा, असे आदेशच त्यांनी दिले.
अजित पवार यांनी आज अधिका-यांची झाडाझडती घेतली.
दिवाळीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे तातडीने सुरु करुन पूर्ण करा, असे आदेशच त्यांनी दिले.
बारामती वार्तापत्र
शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या अधिका-यांना दिल्या. अनेकदा सूचना देऊनही ही कामे सुरु होत नसल्याबद्दल आज अजित पवार यांनी आपल्या शैलीत अधिका-यांना खडे बोल सुनावले.
बारामती नगरपालिका हद्दीतील रस्ते नगरपालिकेने, जिल्हा परिषद हद्दीतील रस्ते जिल्हापरिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान बारामती नगरपालिकेतील डांबरीकरण व कॉंक्रीटीकरणाच्या 82 कामांच्या तीन निविदांना मंजूरी मिळाली असून या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर संबंधित कंत्राटदारांना दिलेल्या असून ही कामे काही ठिकाणी सुरु झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली. जवळपास 14 कोटी रुपयांची ही सर्व कामे आहेत.