अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार
अंदाजे वय 2 वर्षे वयाचा मादी जातीचा कोल्हा ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार
अंदाजे वय 2 वर्षे वयाचा मादी जातीचा कोल्हा ठार
इंदापूर प्रतिनिधी –
घागरगाव (ता.इंदापूर) येथे पुणे – सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी जातीचा कोल्हा ठार झाला.
याबाबत वनपरिक्षेत्रधिकारी अजित सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.10) जानेवारी रोजी सकाळी पुणे- सोलापूर महामार्गावर तालुक्यातील घागरगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे वय 2 वर्षे वयाचा मादी जातीचा कोल्हा ठार झाला.या घटनेची वनपरिक्षेत्र अधिकारी इंदापूर यांना माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले व पंचनामा केला.त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन काकडे यांनी शवविच्छेदन केले.डॉक्टरांच्या मते कोल्हा (मादी) अंदाजे एक ते दीड महिन्याची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक मोठ्याप्रमाणावर सुरू असल्याने,असे अपघात वारंवार होत आहेत. तसेच या अपघातांमध्ये वन्यप्राण्यांची संख्याही कमी होत असल्याने प्राणीमित्रांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून अज्ञात वाहनाच्या धडकेत अनेक वन्यजीव मृत्यूमुखी पडले आहेत. या महामार्गावर वनविभागाने या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने हळू चालविण्यास संबंधी सूचना फलक लावावेत. तसेच या मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.