अडीच महिन्यानंतरअखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, ‘सागर’वर मुख्यमंत्र्यांकडे प्रत सुपूर्द, आता पुढे काय, आमदारकीही जाणार?
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.

अडीच महिन्यानंतरअखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, ‘सागर’वर मुख्यमंत्र्यांकडे प्रत सुपूर्द, आता पुढे काय, आमदारकीही जाणार?
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.
मुंबई: प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे मंत्री धनंजय मुंडेंना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या या हत्याकांडासंदर्भातील धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेत धनंजय मुंडेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावरच राजीनामा द्या, असे आदेश दिले. त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी त्यांच्या स्वकीय सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्यासंदर्भातील माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.
“धनंजय मुंडेंनी राजीनामा माझ्याकडे दिला असून मी तो स्वीकारला आहे. हा राजीनामा मी पुढे राज्यपालांकडे पाठवला आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दिली. मुख्यमंत्री फडणवीस हे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आधीपासून आग्रही होते. मध्यरात्री अजित पवारांच्या बंगल्यावरील बैठकीमध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा आजच द्या असे आदेश दिले होते. या बैठकीमध्ये अजित पवारांबरोबर सुनिल तटकरेही उपस्थित होते.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय देशमुख एक्सवर पोस्ट करत म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर-
वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते. वाल्मिक कराड याने आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावरुन कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद होते. या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. हा सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते. त्याठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती. 6 डिसेंबर 2024 रोजी हा वाद झाला होता. त्यानंतर या भांडणाचा डुख मनात ठेवून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती.