क्राईम रिपोर्ट

बारामतीमध्ये सावकारी करणाऱ्या महिलेला व तिच्या साथीदाराला गुन्हा दाखल

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व हॉटेलवर येऊन गोंधळ घालून हॉटेल बंद करण्याची धमकी देत घरी येऊन त्रास देण्याचीही धमकी

बारामतीमध्ये सावकारी करणाऱ्या महिलेला व तिच्या साथीदाराला गुन्हा दाखल

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व हॉटेलवर येऊन गोंधळ घालून हॉटेल बंद करण्याची धमकी देत घरी येऊन त्रास देण्याचीही धमकी

क्राईम; बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील टी. सी.कॉलेज जवळील महिलेने, व्याजाच्या पैशासाठी बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देत,तिच्या साथीदार याच्यामार्फत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या डोर्लेवाडीतील एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

राजश्री रमेश मोरे (रा.टी.सी. कॉलेज जवळ,ता.बारामती,जि. पुणे),विशाल बाबूराव सूर्यवंशी (रा.डोर्लेवाडी,ता.बारामती,जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी किरण सातव (रा.माळेगाव कारखाना, शिवनगर,ता.बारामती,जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि कलम ३८४,३८५,५०४ ५०६,५०७ (३४), महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद कॉलेज नजीक राहणाऱ्या राजश्री रमेश मोरे व डोर्लेवाडी तालुका बारामती येथील विशाल बाबुराव सूर्यवंशी या दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी शहरातील कसबा येथे हॉटेल व्यवसाय का असलेल्या किरण सातव यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

सातव यांना व्यवसायांमध्ये अचानकपणे पैशाची गरज लागल्याने त्यांनी पैशासाठी विचारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचा मित्र विशाल सूर्यवंशी याने राजश्री मोरे ही महिला व्याजाने पैसे देते, तिच्याकडून व्याजाने पैसे घेऊन देतो. लवकर भरले तर काही अडचण येणार नाही असा सल्ला दिला आणि त्याने राजश्री मोरे हिला किरण सातव याची ओळख करून दिली.

मोरे हिने सातव याला 55 हजार रुपये व्याजाने दिले. त्यानंतर त्याचे हप्ते किरण सातव यास फेडता न आल्याने प्रत्येक आठवड्याला सात हजार रुपयांचे व्याज देण्याची अट राजश्री मोरे हिने घातली. त्यानुसार मोरे हिला पाठवलेला व्याजाचे पैसे सातव देत होता. दरम्यान पैसे थकलेने मोरे हिने सातव यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली.

याप्रमाणे मोरे हिला दर आठवड्याला व्याजाचे पैसे दिले जात होते,आरोपी मोरे हिने सातव यांच्याकडे तीन लाख देण्याची मागणी केली होती,व्याजाची परतफेड केल्यानंतरही ती सातव यांना वारंवार मला पैसे दिले नाही तर तुझ्यावर बलात्काराची खोटी केस दाखल करून तुला कुठेही तोंड दाखवायची जागा ठेवणार नाही,तसेच तुझ्या हॉटेलवर येऊन तुझे हॉटेल बंद करेल,तुझ्या घरी येऊन गोंधळ करेल असे म्हणत वारंवार शिवीगाळ व दमदाटी करत होती. तसेच मुलीचा साथीदार विशाल सूर्यवंशी याने बऱ्याच वेळा हॉटेलवर येऊन मला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून माझ्या हॉटेलवर गोंधळ देखील घातलेला आहे.दरम्यान या नंतर फिर्यादी किरण सातव यांनी त्रासाला कंटाळून अखेर कुटुंबाच्या मदतीने बारामती शहर पोलिसांत धाव घेतली आणि राजश्री मोरे व तिचा साथीदार विशाल सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.यानंतर शहर पोलिसांनी महिलेसह युवकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!