अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या 140 कुटुंबाना नगरसेवक बिरजू मांढरे यांनी केली मदत
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते साहित्यांचे वाटप
अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या 140 कुटुंबाना नगरसेवक बिरजू मांढरे यांनी केली मदत
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते साहित्यांचे वाटप
बारामती वार्तापत्र
दि.14 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत जळोची येथील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते.या नागरिकांना दि.17 रोजी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू भैया मांढरे यांच्या स्वखर्चातुन नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे यांच्या उपस्थितीत व जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांच्या हस्ते अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या 140 कुटुंबाना पांघरण्यासाठी उबदार रघ, चादर, महिलांना साड्या, 5 किलो घऊ, 5 किलो तांदूळ, 1 किलो तेल, मिठ,वांगी,टोमॅटो,बटाटे,भेंडी,काकडी,भोपळा,मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, मेथी इत्यादी फळ भाज्या आणि पाले भाज्यांचे वाटप केले या वेळी नगरसेवक अभिजीत जाधव व मा. नगरसेवक अभिजीत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते धनंजय तेलंगे, अंकुश मांढरे उपस्थित होते.