अनावश्यक खर्च टाळून थोपटेवाडी ग्रामपंचायत येथे महापुरुषांची प्रतिमा व वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा .
प्रत्येक गावोगावी महापुरुषाची जयंती उस्ताहात साजरी करून त्यांचे विचार तरुणांनी समाजात रुजवावे असा संदेश या वेळी देण्यात आला.

बारामती वार्तापत्र
क्रांतिसूर्य कामगार संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष श्री.लखन कडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय संविधानाची प्रत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या प्रतिमा देऊन व वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, भीम फौंडेशनचे अध्यक्ष गणेश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष दत्तात्रय (काकासाहेब) सोनवणे, बारामती तालुका अध्यक्ष अमोल खरात, बहुजन समाज पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते विक्रम भैय्या कोकरे, भीम फौंडेशनचे प्रमुख मनोज ठोंबरे, सुदाम चव्हाण, शरद कांबळे, संजय साबळे, विनोद साळवे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक गावोगावी महापुरुषाची जयंती उस्ताहात साजरी करून त्यांचे विचार तरुणांनी समाजात रुजवावे असा संदेश या वेळी देण्यात आला.