
अनिकेत यादव यांचे बारामतीत शनिवारी व्याख्यान…
श्रीमंती फक्त पैशांत मोजता येत नाही
बारामती वार्तापत्र
रसिक बारामतीकरांची अभिरुची अधिक संपन्न व्हावी, प्रतिभावंतांशी त्यांना हितगुज साधता यावे, त्यांचे विचार ऐकता यावेत या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबिंब व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.
याच व्याख्यानमालेअंतर्गत शनिवारी (ता. 22) प्रसिध्द व्याख्याते अनिकेत यादव तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे का…या विषयावर संध्याकाळी सहा वाजता विद्यानगरीतील गदिमा सभागृहात बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
अनिकेत यादव हे व्याख्याते असून विविध विषयांवर व्याख्यान देतात. श्रीमंती फक्त पैशांत मोजता येत नाही, सर्व बाबतीत त्याचा विचार कसा करावा या बाबत यादव विचार मांडणार आहेत. या व्याख्यानासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.