इंदापूर

अनुकंपाखाली नोकरीची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा

प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री भरणेंच्या उपस्थित मंगळवारी बैठक

अनुकंपाखाली नोकरीची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा

प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री भरणेंच्या उपस्थित मंगळवारी बैठक

इंदापूर : प्रतिनिधी

पालकांच्या मृत्युनंतर अनुकंपा तत्वानुसार वारसाहक्काने नोकरीस घेण्यास आस्थापना विभागातील कर्मचारी जाणूनबुजून विलंब करत असल्याचा दावा करत त्याच्या निषेधार्थ मयत कामगारांचे वारस सोमवार ( दि.१५ ) पासून इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात प्राणांतिक उपोषणास बसले आहेत.त्यास इंदापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला असून आंदोलनकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.

इंदापूर नगरपरिषदेतील कर्मचारी लक्ष्मी शंकर धोत्रे,मंगल रामा ढावरे,तानाजी निवृत्ती मखरे,दशरथ शंकर सरवदे हे कामावर रुजू असताना मयत झाले आहेत.त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नातेवाईकांनी अनुकंपा तत्वावर कामास घेण्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र मागासवर्गीय समाजातील असल्याकारणाने आम्हाला नोकरीस घेण्यास जाणूनबुजून विलंब केला जात आहे.असा दावा करत त्याच्या निषेधार्थ महेश दशरथ सरवदे,माधुरी बाळू पवार,शिवाजी तानाजी मखरे व सारिका चंद्रकांत पवार यांनी दि.१५ नोव्हेंबर पासून बेमुदत प्राणांतिक उपोषणाचा मार्ग अवलंबिला.दरम्यान बुधवारी (दि.१७) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे आणि नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि संबधीत विभागाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये मंगळवारी (दि.२३) बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातील निवेदन दिले.प्रसंगी आंदोलनकर्ते यांनी प्राणांतिक उपोषण मागे घेत जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करीत असल्याचे सांगितले.

दरम्यान संबंधित आंदोलनकर्त्यांना पाठिंबा म्हणून गुरुवारी (दि.१७) माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,आरपीआयचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे आणि वडार पॅंथर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पवार यांनी एकदिवसीय उपोषण केले आहे.

तसेच बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे,आरपीआयचे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे,आरपीआयचे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे,पीआरपीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे,समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ,वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सचिव हनुमंत कांबळे,सुधीर मखरे,शिवराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख,मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तमराव पाटील,तानाजी धोत्रे,संजय शिंदे, ॲड.समीर मखरे,ॲड.किरण लोंढे,प्रमोद चव्हाण,रोहिदास पवार,पिंटू घोडके,दुर्गा शिंदे,भैय्यासाहेब शिंदे तसेच अन्य सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram