इंदापूर

अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशनद्वारा वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप

रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात

अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशनद्वारा वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप

रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात

पुणे प्रतिनिधी

अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशनद्वारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्ताने (दि.22) जून रोजी वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी वारकरी बंधू भगिनींना फाउंडेशनच्या वतीने सुमारे दोनशे रेनकोट, अडीचशे छत्री,एक हजार बिस्कीट पुडे,दहा हजार पाणी बॉटल,पाच हजार कप चहा आणि 50 किलो साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले.

जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले || तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा || श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वरील अभंगाप्रमाणे ज्यांचे आचरण आहे असे व्यक्तिमत्त्व व आमच्या संस्थेचे आधारस्तंभ,संस्थापक, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान अनुजा सुशांत पाटील, डॉ. सुशांत पाटील सर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अनुजा सुशांत पाटील मॅडम, (संस्थापक/संचालक),मा.श्री सुशांत पाटील (संचालक) होते. तर श्रीराम चव्हाण (प्रोजेक्ट डायरेक्टर),श्री रोहन पवार (आर्थिक सल्लागार),संजय भोर, प्रिती मॅडम HR, तुषार ठोंबे,सुमित राणे, आशिष,वेदांत लांजेकर, मदन आडे, सिद्धू जाधव,योगेश महाजन,रणजित शिंदे,प्रियंका पाटील, श्रद्धा पाबळवार,प्रिया जाधव, दिशा टिकास,छाया भेलके,हरिदास खेंगळे,लक्ष्मण रेनपुरे,स्वप्निल देशमुख, लक्ष्मीकांत मापलवार, रोहिदास खोपडे (सरपंच)गुजर वाडी,तसेच संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी, श्री विजय भाऊ,डॉ.गणेश पवार, श्री आशिष जगताप उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी जागेची विनामूल्य उपलब्धता श्री गणेश सुरवसे (सरपंच) उरळी देवाची, यांनी करून दिली.

Related Articles

Back to top button