‘जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाचा वाणेवाडी येथे शुभारंभ
शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत-उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख

‘जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाचा वाणेवाडी येथे शुभारंभ
शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत-उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख
बारामती वार्तापत्र
शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड” तसेच जलतारा योजनेच्या माध्यमातून नारळ लागवडीचा शुभारंभ ग्रामपंचायत वाणेवाडी येथे शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख यांच्या हस्ते नारळ लागवड करण्यात आली; यावेळी त्यांनी लाभार्थींना नारळ लागवड व जलतारा योजनेबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शाश्वत शेती, पाणलोट विकास तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, सरपंच गीतांजली जगताप, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी विजय चव्हाण, कृषी पर्यवेक्षक भारत माने, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कृषी मित्र, तालुका समन्वयक, ग्रामस्थ तसेच सर्व मनरेगा कर्मचारी उपस्थित होते.