
अनेकान्तचा शिवराज देशात अव्वल
स्पर्धेत ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
बारामती वार्तापत्र
‘अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे, ऑफिसिअल पार्टनर ऑफ युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील गायन व वादन स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्याचा निकाल १ जूनला जाहीर झाला.
तबला वादन स्पर्धेत आपल्या स्कूलचा इयत्ता- आठवीतील कु. शिवराज विनोद कुंडलकर या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.
त्याचबरोबर इयत्ता- दहावीतील कु. अभिराज दुर्गाप्रसाद कुलकर्णी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक
पटकाविला. तसेच गायन स्पर्धेत आपल्या स्कूलची इयत्ता- पाचवीतील कु. काव्या कौस्तुभ टंकसाळे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकाविला.
या सर्व विद्यार्थ्यांची थायलंड या ठिकाणी होणाऱ्या
आंतरराष्ट्रीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेचे संगीत शिक्षक श्री. अक्षय सुधाकर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे संस्थेचे अध्यक्ष श्री. जवाहर शहा(वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शहा(वाघोलीकर), स्कूलचे चेअरमन श्री. चंद्रवदन शहा(मुंबईकर) व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच प्राचार्या यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे
अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.