शैक्षणिक

अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS) बारामती येथे १४ वी राष्ट्रीय परिषद संपन्न

राज्यांतुन ३३ शोधनिबंध प्राप्त झाले व त्यातील निवडक ३१ शोधनिबंधांचे प्रकाशन ISBN प्रमाणित जर्नल मध्ये केले गेले.

अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS) बारामती येथे १४ वी राष्ट्रीय परिषद संपन्न

राज्यांतुन ३३ शोधनिबंध प्राप्त झाले व त्यातील निवडक ३१ शोधनिबंधांचे प्रकाशन ISBN प्रमाणित जर्नल मध्ये केले गेले.

बारामती वार्तापत्र 
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (AIMS), बारामती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या सहयोगाने १४ वी राष्ट्रीय परिषद दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी हायब्रीड पध्दतीने संपन्न झाली.
व्हॅल्यू ड्रिव्हन अँड टेक्नो-पॉवर्ड गव्हर्नन्स इन सायन्स,सोशियोइकॉनॉमिक अँड मॅनेजमेंट हा या परिषदेचा विषय होता.
अनेकांत इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्   गव्हर्निंग कौन्सिल सदस्य सोनिक शाह (पंदारकर) यांचे अध्यक्षीय भाषण झाले व संचालक डॉ. एम.ए. लाहोरी यांनी प्रास्ताविक केले.
सदर परिषदेच्या उदघाटन समारंभाचे प्रमुख अतिथी  रणजित शिंदे, तिरंगा फौंडेशन, फलटण यांनी उद्योजकता, सामाजिक आर्थिक व्यवस्थापन आणी नैतिक मुल्ये या विषयावर मार्गदर्शन केले व सन्माननीय अतिथी  श्रीकांत कुलकर्णी, अन्न सुरक्षितता व गुणवत्ता व्यवस्थापक, शायबर डायनॅमिक्स डेअरीज् प्राव्हेट लिमिटेड, बारामती यांनी अन्न गुणवत्ता जतन आणि कालबाह्यता यांचे परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. तांत्रिक वक्ते म्हणून डॉ. रामाप्पा के. बी, ADRTC बेंगळुरू, कर्नाटक यांनी शोधनिबंध, केस स्टडी, आणी प्रबंध लिखाणासाठी आवश्यक कुशलता या विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच सदर परिषदेचे समापन सत्राचे प्रमुख अतिथी श्री. सुरेश बी. उमप, फॉउंडर अँड चेअरमन, शिवमुद्रा इनोवेटिव्ह फॉउंडेशन, पुणे यांनी तरुणांमध्ये उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन केले.

या परिषदेस अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  जवाहर शहा (वाघोलीकर) व सचिव  मिलिंद शाह (वाघोलीकर) तसेच अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे सचिव डॉ. हर्षवर्धन व्होरा व संचालक डॉ. एम. ए. लाहोरी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर परिषदेच्या संयोजिका प्रा.डॉ.संध्या खटावकर यांच्या नियोजना अंतर्गत सदर परिषदेमध्ये सहभागासाठी देशभरातील महाराष्ट्र, तामीळनाडु, केरळ,कर्नाटक इत्यादी राज्यांतुन ३३ शोधनिबंध प्राप्त झाले व त्यातील निवडक ३१ शोधनिबंधांचे प्रकाशन ISBN प्रमाणित जर्नल मध्ये केले गेले.

सदर परिषदेचे सारांश प्रदर्शन प्रा.डॉ.डी.पी.मोरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram