क्रीडा

अनेकान्त  एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार 'योग संगम'  या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

अनेकान्त  एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ‘योग संगम’  या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

बारामती वार्तापत्र

अनेकान्त  एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालयात अकरावा योग दिन मोठ्या उत्साहात व  उत्सवमूर्ती  वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी  अनेकान्त  एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री . जवाहर  शाह (वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर), व खजिनदार श्री. विकास शहा (लेंगरेकर) यांनी सर्वाना जागतिक  योग दिनाच्या  शुभेच्छा दिल्या.

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ‘योग संगम’  या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुशील अशोकराव देशमुख यांनी उपस्थित राहून योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. त्यांनी वज्रासन, पद्मासन, ताडासन, प्राणायाम यांसारख्या विविध योगासनांचे मार्गदर्शनासह सादरीकरण केले.  महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनीही या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन होलिस्टिक डेव्हलपमेंट सेल च्या सहकार्याने करण्यात आले. सकाळी ६:३० ते ७:४५  या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये योगाभ्यासाच्या माध्यमातून मानसिक शांतता, आत्मअनुशासन आणि सकारात्मक उर्जेचा अनुभव सहभागी  विद्यार्थ्यांनी घेतला.

कार्यक्रमाचे सुंदर व नेटके सूत्रसंचालन कु. अंकिता टिपाले (बी.फार्मसी) हिने केले. कार्यक्रमाचे मनोगत आणि आभारप्रदर्शन महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. दर्शन शहा यांनी केले.

Related Articles

Back to top button