बारामतीत मनसेने प्रतीकात्मक स्वरूपात दहीहंडी फोडून महाराष्ट्र शासनाचा केला निषेध….
महाराष्ट्र शासनाची दडपशाही हुकूमशाही यापुढे कदापि खपवून घेतली जाणार नाही.

बारामतीत मनसेने प्रतीकात्मक स्वरूपात दहीहंडी फोडून महाराष्ट्र शासनाचा केला निषेध….
महाराष्ट्र शासनाची दडपशाही हुकूमशाही यापुढे कदापि खपवून घेतली जाणार नाही.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने (दि:१) रोजी बारामती पंचायत समिती चौकामध्ये प्रतीकात्मक स्वरूपात दहीहंडी फोडून महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अँड. विनोद जावळे यांनी बारामती पंचायत समिती चौकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सालाबादप्रमाणे होणारी “राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव” ही दहीहंडी प्रतीकात्मक स्वरूपात फोडून महाराष्ट्र शासनाचा निषेध केला.
महाराष्ट्र शासनाला सर्व राजकीय कार्यक्रम चालतात मेळावे चालतात हिंदूंचे व मराठी बांधवांचे सन का चालत नाहीत असा टोला मनसेने लगावला आहे. हिंदू विरोधी राज्य शासनाच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून शासनाचा निषेध करत दहीहंडी फोडण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाची दडपशाही हुकूमशाही यापुढे कदापि खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्र शासन हे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भीती दाखवून हिंदू सणांवरती निर्बंध लादत आहे. महाराष्ट्र शासन जनतेची दिशाभूल करत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदूंचे सण मराठी बांधवांचे सण संपूर्ण महाराष्ट्रात इथून पुढे साजरी करतील. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून सांगण्यात आले.
या प्रसंगी निलेश कदम, तालुका व शहर संघटक बाबा सोनवणे , शहराध्यक्ष ऋषी पवार, श्रीकांत रोकडे ,नितेश थोरात ,शिवदत्त, विजय ,सोमनाथ पवार, अक्षय काळे इत्यादी पदाधिकारी तसेच मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.