अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामतीतर्फे कोजागरी मैफल संपन्न
जुन्या हिंदी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम
अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामतीतर्फे कोजागरी मैफल संपन्न
जुन्या हिंदी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामतीतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जिवराज सभागृहात स्वर संगत, पुणे तर्फे प्रस्तुत “सुरमई शाम” यांच्या जुन्या हिंदी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर व सचिव, मिलिंद शाह वाघोलीकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन शहा, चेअरमन सांस्कृतिक विभाग यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमामध्ये मधुबन मे राधिका नाचे रे, ओ मेरी जोहरजबी, आओ हुजूर तुमको बहारो में चलू, छोड दो आंचल जमाना क्या कहेगा, एक चतुर नार, लावणी रेशमाच्या रेघांनी अशी अनेक गीते गायिली व श्रोत्यांस मंत्रमुग्ध केले.
तर लागा चुनरी में दाग छुपावू कैसे या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांचा सत्कार लतिकाकाकी शाह यांनी केला. तर अतिरिक्त पोलीस अधिक्षक रोहित लेंगरेसाहेब, स्वरसंगत प्रमुख अली हुसेन यांचा सत्कार चंद्रगुप्त शाह वाघोलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तर स्वरदा गोडबोले यांचा सत्कार प्रीती शाह यांनी केला तर अजय राव यांचा विकास शहा लेंगरेकर सत्कार यांनी केला.
कल्याणी देशपांडे यांचा सत्कार कुसूमकाकी शाह वाघोलीकर तर निवेदिका सायरा अली हुसेन यांचा सत्कार संध्या चंद्रवदन शहा मुंबईकर यांनी केला. हर्षवर्धन शहा, चेअरमन सांस्कृतिक विभाग यांचा सत्कार विकास शहा लेंगरेकर यांनी केला.
या कार्यक्रमास बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, पौर्णिमा तावरे, मंगल शहा (सराफ) विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड.ए.व्ही.प्रभुणे, ऍड.सुभाष ढोले, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार सुनील शहा (लेंगरेकर), चंद्रगुप्त शाह (वाघोलीकर), चंद्रवदन शहा (मुंबईकर), सोनिक शहा(पंदारकर), सत्यजित शहा (पंदारकर), डॉ.हर्षवर्धन व्होरा, करन शहा, डॉ.जे.जे.शहा, धवल शाह, राहुल शाह (वाघोलीकर), प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, अधिष्ठाता, शास्त्र विभाग डॉ.विकास काकडे, अधिष्ठाता कला विभाग डॉ.सीमा नाईक गोसावी, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भगिनी मंडळ जैन श्राविका मंडळाच्या महिला इ. उपस्थित होते.