शैक्षणिक

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदारपदी विकास शशिकांत शहा (लेंगरेकर) यांची निवड

अनेक वर्षांचा अनुभव

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदारपदी विकास शशिकांत शहा (लेंगरेकर) यांची निवड

अनेक वर्षांचा अनुभव

बारामती वार्तापत्र 

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदारपदी विकास शशिकांत शहा (लेंगरेकर) यांची नुकतीच निवड करण्यात आली.

विकास शहा (लेंगरेकर) हे सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे आर्थिक व्यवहार पाहत आहेत. वक्तशीरपणा,  चोख व्यवहार, कामामधील पारदर्शकता, शिस्तबद्ध रितीने काम करणे इ. अनेक वर्षांचा अनुभव पाहता संस्थेने विकास शहा (लेंगरेकर) यांच्या नावाची निवड केली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांनी सांगितले. यापूर्वी खजिनदारपदी सुनिल शिवलाल शहा (लेंगरेकर) यांनी १२ वर्षे नियामक मंडळाचे खजिनदार पदावरून अत्यंत पारदर्शकपणे व तळमळीने काम केले.

संस्थेच्या विकासामध्ये सुनिलभाई यांचे मोलाचे योगदान आहे असे विचार संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांनी व्यक्त केले.

सुनिल शिवलाल शहा यांचे वडील स्व.शिवलाल प्रेमचंद शहा यांनी देखील संस्थेच्या स्थापनेपासून अनेक वर्षे खजिनदारपदी काम केले होते.

नवनियुक्त खजिनदार विकास शशिकांत शहा (लेंगरेकर) यांना त्यांच्या पुढील कामकाजाकरिता मा.अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), सर्व विश्वस्त,  प्राचार्य,  उपप्राचार्य,  रजिस्ट्रार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button