अनेकान्त कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती — गुणवत्तेचे प्रतीक, विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश
राज्यभरातील २१ महाविद्यालयांतील सुमारे ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग

अनेकान्त कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती — गुणवत्तेचे प्रतीक, विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश
राज्यभरातील २१ महाविद्यालयांतील सुमारे ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या, कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती येथील विद्यार्थ्यांनी शारदानगर, बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय सेमिनार व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.
“Future-Ready Pharmacists: Transforming Community Health for the Next Decade” या विषयावर अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या स्कूल ऑफ फार्मसी अॅण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात राज्यभरातील २१ महाविद्यालयांतील सुमारे ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अनेकान्त कॉलेज ऑफ फार्मसी येथून डिप्लोमा प्रथम व द्वितीय वर्षातील ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसी चे सक्षम काटे व कु. वैष्णवी भंडलकर यांनी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तिसरा क्रमांक (सेकंड रनर-अप) पटकावला.
या यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) व सचिव मा. श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर) तसेच प्राचार्य डॉ. दर्शन शहा यांनी विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






