शैक्षणिक

‘अनेकान्त’ मध्ये संस्कृत दिवस उत्साहात साजरा

स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

‘अनेकान्त’ मध्ये संस्कृत दिवस उत्साहात साजरा

स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग
नोंदवला.

बारामती वार्तापत्र
अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संस्कृत
दिनाचे औचित्य साधत वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.
गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, बारामती येथील संस्कृत शिक्षक श्री. सनतकुमार वीरकुमार खोत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
प्रमुख अतिथी श्री. खोत आणि स्कूलच्या माध्यमिक विभाग प्रमुख सौ. नम्रता
बाभळे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले.
त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी भावपूर्ण संस्कृत गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग
नोंदवला.
विविध विषयांवरील प्रभावी भाषणे, शुद्ध उच्चार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून संस्कृत भाषेचे वैभव आणि महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख अतिथी श्री. खोत यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर
करत विजेत्यांचे अभिनंदन केले आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक
केले. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button