अनेकान्त स्कूलच्या लहान स्केटर्सचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
स्कूलच्या छोट्या स्केटर्सनी जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत इतिहास रचला आहे.

अनेकान्त स्कूलच्या लहान स्केटर्सचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
स्कूलच्या छोट्या स्केटर्सनी जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत इतिहास रचला आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती, दिनांक २३ ते २८ ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग रिंकवर १०० मीटर रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्तम कामगिरी केली. उत्साह, सहनशक्ती आणि जिद्दीचा जबरदस्त संगम !
स्कूलच्या छोट्या स्केटर्सनी जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत इतिहास रचला आहे.
५३ तास सतत रिले स्केटिंग करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणार्या या पथकात अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या इ. २री अ
मधील ऋत्विका गणेश मतकर, इ. ५वी ब मधील स्वराज सचिन चव्हाण, इ. ७वी क मधील सर्वेश सचिन वायचाळ या विद्यार्थ्यांनी ५३ तास न थांबता, न थकता, न डगमगता स्केटिंग करून या बालकांनी अविश्वसनीय धाडस साकारले.
प्रखर उन्हाळा असो वा अचानक कोसळणारा पाऊस त्यांच्या वेगाचा ताल कधीच मोडला नाही. या छोट्या खेळाडूंनी वय लहान असले तरी मन आणि निर्धार प्रचंड मोठा असल्याचे सिद्ध केले. या गिनीज विक्रमामागे Keep on Rollin Skating Club चे कुशल प्रशिक्षक श्री. तनिष्क शाह आणि सौ. एकता शाह यांचे अचूक नियोजन आणि कष्टमय प्रशिक्षण आहे.
पालकांनी या विद्यार्थ्यांना समर्पित आहार, सराव, वेळ आणि प्रोत्साहन देऊन मुलांच्या स्वप्नांना पंख दिले.
फक्त विक्रम नाही… तर प्रेरणा !
७ वर्षांची ऋत्विका या पथकातील सर्वात लहान स्केटर असून तिचा सहभाग हा ‘बारामतीचा आत्मविश्वास आणि उद्याचे भविष्य’ याचे प्रतिक मानले जात आहे.
हे यश सांगते –
“वय लहान असले तरी प्रयत्न मोठे असले की आकाशालाही छेद देता येतो!” अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष,सचिव त्याचबरोबर स्कूलचे चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व स्कूलच्या प्राचार्या यांनी तेजस्वी बालविजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.






