क्रीडा

अनेकान्त स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय यश ………

आंतरराष्ट्रीय सुवर्णमहोत्सवात दुहेरी मान

अनेकान्त स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय यश …

आंतरराष्ट्रीय सुवर्णमहोत्सवात दुहेरी मान

बारामती वार्तापत्र 

आरामा,  दि. २७ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आणि बुराफा युनिव्हर्सिटी, पटाया (थायलंड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय तबलावादन स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या इ. आठवीतील शिवराज विनोदकुमार कुंडलकर या विद्यार्थ्याने सहभाग घेत अद्वितीय यश संपादन केले.
तबला वादक शिवराज (जु. गट) याने थेट गोल्ड मेडल पटकावून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. याच कार्यक्रमात त्याच्या अद्वितीय लयबद्ध वादनकौशल्याची दखल घेत बुराफा युनिव्हर्सिटी, पटाया यांच्या वतीने शिवराजला STAR GOLD AWARD ने विशेष सन्मानित करण्यात आले. तबलावादनात शिवराज कुंडलकरने आंतरराष्ट्रीय सुवर्णमहोत्सवात दुहेरी मान मिळवला.
शिवराजचा हा यशाचा झळाळता क्षण केवळ त्याचाच नव्हे तर
बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.‘लय, ताल आणि समर्पण’ यांचा उत्तम संगम म्हणजे शिवराजचे वादन.

बारामतीतून उगवलेला एक नवा संगीत-तारा!

त्याचबरोबर या स्पर्धेत (सि. गट) गटातून स्कूलच्या इ. दहावीतील अभिराज दुर्गाप्रसाद कुलकर्णी या विद्यार्थ्याने सहभाग घेत उत्तम यश संपादन करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, सातत्याने दिलेल्या सरावाला आणि स्कूलचे संगीत शिक्षक श्री. अक्षय शिंदे यांच्या योग्य मार्गदर्शनाला आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुवर्णमुकुट लाभला आहे.
त्यांच्या पुढील संगीत वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव त्याचबरोबर स्कूलचे चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व स्कूलच्या प्राचार्या यांनी दोन्ही विजेत्यांचे

मनःपूर्वक अभिनंदन केले.
Back to top button