अनेकान्त स्कूलमध्ये क्रीडा संमेलन उत्साहात साजरे
विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले.
अनेकान्त स्कूलमध्ये क्रीडा संमेलन उत्साहात साजरे
बारामती वार्तापत्र
बारामती दि. 22 व 23 डिसेंबर दरम्यान अनेकान्त एज्युकेशन सोसायटी संचलित अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 2 दिवसीय SPRINTFEST 2024 क्रीडा संमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुनिल पवार, स्कूल चे अध्यक्ष श्री. चंद्रवदनम शहा(मुंबईकर), सदस्य श्री डॉ. प्रितम व्होरा उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले.
विजेत्या खेळाडूंचा व शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. स्कूलचा ‘टीचर ऑफ द इअर अवार्ड’ स्कूलच्या शिक्षिका सौ. हर्षदा खामगळ यांना देण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी बारामतीचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. वैभवनावडकर, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. मिलिंद शहा(वाघोलीकर), स्कूलचे अध्यक्ष चंद्रवदन शहा (मुंबईकर) स्कूलचे सदस्य डॉ. प्रितम व्होरा, कुणाल शहा (वाघोलीकर), सौ. रत्नावली शहा(वाघोलीकर) तसेच स्कूलच्या प्राचार्या व उपप्राचार्या हे उपस्थित होते.