महावीर स्वामींच्या नामाचा महिमा सांगणारे मधुर भजन प्रस्तुत करण्यात आले.
बारामती दि. ०९ एप्रिल रोजी अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधीर शास्त्री उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महावीर स्वामींच्या प्रतिमेच्या पूजनाने केली. स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी नवकार मंत्राचे उच्चारण केले.
महावीर स्वामींच्या नामाचा महिमा सांगणारे मधुर भजन प्रस्तुत करण्यात आले.
त्यानंतर महावीर स्वामींचा जीवन परिचय व्हिडीओच्या माध्यमातून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी महावीर स्वामींचे प्रमुख तत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि त्यानुसार जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन
केले.