बारामती नगरपरिषदेत इच्छुकांचा बळी का? : प्रभाग रचना जैसे थे, आरक्षणाचा सावळागोंधळ…
बारामती नगरपरिषदेची बैलगाड्याखालच्या ....प्रमाणे अवस्था ...बैलगाडी हाकतय कोण..रूबाब करतय कोण...

बारामती नगरपरिषदेत इच्छुकांचा बळी का? : प्रभाग रचना जैसे थे, आरक्षणाचा सावळागोंधळ…
बारामती नगरपरिषदेची बैलगाड्याखालच्या ….प्रमाणे अवस्था …बैलगाडी हाकतय कोण..रूबाब करतय कोण…
बारामती वार्तापत्र
आज बारामती नगरपरिषदेत अंतिम प्रभाग यादी जाहिर केल्यानंतर, प्रभाग रचना जैसे थे व सुनावणीचा एवढा उठाठेव केल्याने नावापुरती सुनावणी घेण्यात आल्याने बारामती नगरपरिषदेचा सावळागोंधळामुळे इच्छुकांना नामुष्कीचा सामना करावा लागला आहे.
काही इच्छुक या सावळा गोंधळामुळे न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचेही कळते. बारामती नगरपरिषदेत एक हाती सत्ता आहे. त्यामुळे हम बोलेसो काम व कायदा राबविला जात आहे.
प्रभाग रचना एका ठिकाणी बसून बनवून अधिकार्यांच्या माथी मारला जातो आणि ती रचना अधिकारी मुक्या बैलाप्रमाणे मान हालवीत सह्या करून मंजूर करीत असतील तर याला सावळागोंधळ नाही तर जागरणगोंधळ म्हणावे का? असेही इच्छुकांमध्ये बोलले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेबाबत भौगोलिक सलगतेनुसार घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन झालेले असताना सुद्धा प्रभाग रचनेबाबत इच्छुकांनी हरकती घेत असतील तरीही प्रभाग रचना जैसे थे मंजूर होत असेल तर याला लोकशाही म्हणता येईल का? असेही बोलले जात आहे.
लोकशाहीचा सरळ-सरळ गळा घोटण्याचे काम होत असेल तर या विरोधात आवाज उठविण्याचे काम एकाच इच्छुकांनी घेण्याचा ठेका घेतला आहे का? असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे.
मंत्र्याच्या गावात जर दबावतंत्राचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम होत असेल तर बारामती नगरपरिषदेचा सावळागोंधळ म्हटले तर वावगे ठरू नये.