
अनेकान्त स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन..
एकूण ५० प्रयोग प्रदर्शनात ठेवले होते.
बारामती वार्तापत्र
बारामती, दि. २८/०२/२०२५ येथील अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध वैज्ञानिक प्रकल्प व वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सौ. जुई चिराग शहा(मुंबईकर) व श्री. भारत काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता ३ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन
सादरीकरण करण्यात आलेल्या प्रयोगांना भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली.
प्रयोगांमध्ये रोबोट, सौर यंत्रणा, औद्योगिक प्रदूषण, रक्ताभिसरण प्रणालीचे कार्य मॉडेल, उत्सर्जन प्रणाली, हृदय, सूर्यग्रहण, भाषा-व्याकरण मॉडेल, नफा, तोटा मॉडेल, कोन मॉडेल, घाऊक, किरकोळ बाजार या प्रकारचे एकूण ५० प्रयोग प्रदर्शनात ठेवले होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेचा अनोखा आविष्कार सादर करत विविध वैज्ञानिक प्रकल्प सादर केले.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळाली.
विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सादर केलेले प्रकल्प पाहून उपस्थित पालक आणि शिक्षक वर्गही प्रभावित झाले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला दाद देत शालेय व्यवस्थापन समितीने त्यांचे विशेष कौतुक केले. स्कूलच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन संशोधनाची आवड वाढेल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.