
‘अनेकान्त’ स्कूल वक्तृत्वात अव्वल
प्रभावी शैलीने परीक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकली.
बारामती वार्तापत्र
वक्तृत्वाच्या व्यासपीठावर अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली छाप सोडली. दि. १२ ऑगस्ट
रोजी जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, बारामती येथे क्रांती दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनेक शाळांचे स्पर्धक सहभागी झाले होते.
मोठ्या गटात इयत्ता आठवीतील कु. स्वरित पंकज अहिरे याने दमदार भाषणाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. ऋग्वेद गोडसे याने ओजस्वी वक्तृत्वातून द्वितीय क्रमांक मिळवला. दोघांच्या सशक्त मांडणीने आणि प्रभावी शैलीने परीक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकली.
अनेकान्त स्कूलचा हा विजय विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शाळेच्या भाषण संस्कृतीला मिळालेलं अभिमानाचं यश ठरलं.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वैज्ञानिक माननीय श्री. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष, सचिव, स्कूलचे चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि प्राचार्या यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.