राजकीय

अनेक घडामोडीनंतर बारामती अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड

गरजू, गरीब व वंचित घटकांसाठी मदतीचा हात

अनेक घडामोडीनंतर बारामती अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड

गरजू, गरीब व वंचित घटकांसाठी मदतीचा हात

बारामती वार्तापत्र

राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनंतर तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत आबा गणपती यांच्या कार्यकर्ते असलेल्या किरण किसन इंगळे यांची शहर अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पक्षाच्या शहरातील संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल घडून आला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

किरण इंगळे यांचा शहरअध्यक्ष निवडीबाबत काही दिवसांपुर्वी पत्र देण्यात आले होते.परंतु पक्षातील काहींनी इंगळे यांच्याबाबत तक्रारी केल्या होत्या त्यामुळे ही निवड स्थगिती करण्यात आली होती अखेर आज ही निवड अधिकृत जाहीर करण्यात आली.

किरण इंगळे यांच्या निवडीमागे त्यांचे पक्षासाठीचे दीर्घकाळापासूनचे निष्ठावान व सातत्यपूर्ण कार्य हे प्रमुख कारण मानले जात आहे. सामाजिक, राजकीय तसेच संघटनात्मक पातळीवर त्यांनी केलेले काम पक्षाच्या हिताचे ठरले असून, ते नेहमीच कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या आई स्व. बायडाबाई इंगळे या बारामती नगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात समाजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. विशेषतः गरजू, गरीब व वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.

राजकारणासोबतच समाजकारणातही त्या तितक्याच सक्रिय होत्या. सामाजिक उपक्रम, मदतकार्य, तसेच गरजू लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या सदैव तत्पर असत. त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून मुलांना शिक्षित करून व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडवले.

तसेच त्यांचे बंधू शाम इंगळे यांनी यापूर्वी पक्षासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, संघटना बांधणीतील त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शनही या निवडीसाठी महत्त्वाचे ठरल्याचे बोलले जात आहे.

या बदलामुळे शहरातील पक्ष संघटनेला नव्या दिशेने काम करण्याची संधी मिळणार असून, युवक व नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी किरण इंगळे प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामती शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते सक्रिय भूमिका घेतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

एकूणच शहर अध्यक्षपदी झालेल्या या बदलामुळे बारामतीच्या राजकीय वातावरणात नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, येत्या काळात पक्षाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चौकट ;

सदरचे पद किरण इंगळे यांना मिळणार म्हणून काही विघ्नसंतोषी लोकांनी ना. अजित पवार यांना किरण इंगळे यांची प्रतिमा मलिन होईल असे सांगितले असल्याचे कळते. त्यामुळे निवडीचे पत्र देऊनही किरण इंगळे यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतर निवड पत्र देऊन काम करण्यास सांगावे असे ना. पवार यांनी सांगितले.

किरण इंगळे यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमून त्या समितीने चोख अहवाल दिला. यामध्ये किरण इंगळे हे स्वच्छ प्रतिमेचे कोणाचीही फसवणूक, अडवणूक व पिळवणूक न करणारे निघाले. काहींनी केलेल्या आरोपाचे एकप्रकारे खंडन झाले. यामधून पक्षातील कार्यकर्त्यांना एक गोष्ट कळाली कस्तुरी कितीही दडपली तरी ती दर्वळल्याशिवाय राहत नाही असे किरण इंगळे यांचे व्यक्तीमत्व यामाध्यमातून सर्वांसमोर आले.

 

Back to top button