अनोखा मुजरा ; छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सादीया सलीम सय्यद ही मुंबई ते पुणे धावणार

सादिया ही मुळची बारामतीची असुन मुंबईतील एका बँकेत नोकरी करते.

अनोखा मुजरा ; छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त बारामतीची सादीया सलीम सय्यद ही मुंबई ते पुणे धावणार

सादिया ही मुळची बारामतीची असुन मुंबईतील एका बँकेत नोकरी करते.

बारामती वार्तापत्र

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. अनेक जण शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. पण सादीया सलीम सय्यद ही शिवजयंती निमित्त मुंबई  ते पुणे असा प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनोखा मुजरा करणार आहे.

सादीया सलीम सय्यद ही महिला धावपटू शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईतील  गेट वे ऑफ इंडिया ते पुण्यातील लाल महालापर्यंत  धावणार आहे.  शुक्रवारी पहाटे तीन वाजता तिच्या या महा मॅरेथॉन रनला सुरुवात होणार असून शनिवारी शिवजंतीच्या दिवशी ती पुण्यातील लाल महालात पोहचणार आहे. गेट वे ऑफ इंडीया ते लाल महालापर्यंतचे अंतर जवळपास 165 किलोमीटरचे असून या दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे धावपटू  तिला साथ देण्यासाठी या रनमधे सहभागी होणार आहेत. बारामती स्पोर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

सादिया ही मुळची बारामतीची असुन मुंबईतील एका बँकेत नोकरी करते. मराठा साम्राज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक होते, त्यामुळे शिवजयंतीनिमित्तानं या मॅरेथानचं आयोजन केलं जात आहे, असं सदियानं सांगितलं. डीसीपी राज टिळक रोशन यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला.

Related Articles

Back to top button